नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुढे ढकलण्यात आलेली भारतीची जनगणना आता पुन्हा सुरू होणार आहे. २०२५ मध्ये जनगणना सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वी २०११ मध्ये जनगणना झाली होती. ताजी जनगणनेच्या आकडेवारीवरून लोकसभेच्या जागांचे सीमांकन होऊ शकते असे सांगितले जात आहे.इंडिया टुडेच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, देशाच्या लोकसंख्येचे अधिकृत सर्वेक्षण २०२५ मध्ये सुरू होऊ शकते.
हे सर्वेक्षण २०२६ पर्यंत सुरू राहील. जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८ पर्यंत सुरू राहू शकते. काही काळापूर्वी जनगणनेबाबत सरकारकडून तयारी सुरू असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. पण अद्याप याबाबत अधिकृत काहीच सांगण्यात आले नाही.