जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर चोपडा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप सुप्रसिध्द मराठी अभिनेते अंशुमन विचारे यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात झाला.
दि.२४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठाच्या प्रांगणात युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सव झाला. या महोत्सवात ११९ महाविद्यालयांमधील १४०९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ६०४ विद्यार्थी व ८०५ विद्यार्थिंनींचा सहभाग होता.
सुप्रसिध्द मराठी अभिनेते अंशुमन विचारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यार्थी विकास समन्वय समितीचे अध्यक्ष नितीन झाल्टे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा.एस.टी.भुकन, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. कपील सिंघल, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, डॉ. जगदीश पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे तसेच प्रा. सुनील नेवे, प्रा. प्रशांत देशमुख यांची उपस्थिती होते.
यावेळी बोलतांना अंशुमन विचारे यांनी मोठी स्वप्ने बघा आणि ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. सगळयांशी नीट वाघण्याचा प्रयत्न करा. झालेल्या चुकांबाबत आत्मपरीक्षण करा असा मित्रत्वाचा सल्ला दिला. आपल्या यशात पडद्यामागे असणाऱ्या व्यक्ती महत्वाच्या असतात असे सांगून त्यांनी फु – बाई – फु या मालिकेच्या अनुषंगाने मंगळा गौरीतील कार्यक्रमाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यातील काही उखाणे त्यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे म्हणाले की, या महोत्सवातून शिस्त आणि संस्कार पाहायला मिळालेत. लोककलेची विविध रूपे बघता आली. भारतीय कला आणि संस्कृती ही जगाने स्वीकारली असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्चरी यांनी या महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये कला सादर करतांना प्रचंड आत्मविश्वास दिसून आला, एकात्मतेचे दर्शन घडले आणि नवे विचार व्यक्त झाले असे मत मांडले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट उपयोगी नाही तर दृष्टीकोन आणि प्रेरणा महत्वाची आहे. आपल्यातील उणिवा शोधून त्यावर मात करा असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने हर्षवर्धन वाघ, अमोल पाटील, वैशाली पारधी, पवन मराठे यांनी तर संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ. आशा कांबळे, प्रा. मंजुषा देसले, प्रा. वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन व डॉ. योगेश महाले यांनी केले. यावेळी अधिसभा सदस्य यांच्या हस्ते काही पारितोषिके देण्यात आली.
समारोपाच्या कार्यक्रमास अधिसभा सदस्य प्राचार्य प्रा.एस.एन. भारंबे, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, प्रा. धिरज वैष्णव, अमोल मराठे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, भानुदास येवलेकर, सुरेखा पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम यांच्यासह संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध समिती सदस्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन, प्रा. योगेश महाले तसेच प्रा. योगिता चौधरी यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.
युवारंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
१) संगीत विभाग
1. शास्त्रीय वादन(स्वरवाद्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
2. शास्त्रीय वादन (तालवाद्य):- महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (प्रथम), मु.जे. महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
3. शास्त्रीय गायन:- पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), अॅङ सीताराम बाहेती महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
4. लोकसंगीत (वाद्यवृंद) :- मु.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), बी.पी. आर्टस, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय, चाळीसगाव (तृतीय)
5. समुह गायन (भारतीय):- प्रताप महाविद्यालय,अमळनेर (प्रथम), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (व्दितीय), विद्यापीठ प्रशाळा, क..चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
6. सुगम गायन (भारतीय):- पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
7. नाट्य संगीत:- पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (प्रथम), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (द्वितीय), मु.जे. महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
8. समुह गायन (पाश्चिमात्य):- महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (प्रथम), जी.एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजि. अॅण्ड मॅनेजमेंट, जळगाव (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
9. पाश्चिमात्य वाद्यसंगीत:- विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ मु.जे. महाविद्यालय (तृतीय)
10. पाश्चिमात्य गायन :- जी.एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजि. अॅण्ड मॅनेजमेंट, जळगाव (प्रथम), आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा., शिरपूर (तृतीय)
२) नृत्य विभाग
1. शास्त्रीय नृत्य:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), मणियार विधी महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), जी.एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजि. अॅण्ड मॅनेजमेंट, जळगाव (तृतीय)
2. समुह लोकनृत्य:- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
३) वाड्मयीन (साहित्य) कला
1. वादविवाद:- नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव (प्रथम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल विधी महाविद्यालय, धुळे (द्वितीय), के.सी.ई.सोसायटीचे शिक्षण व शा.शिक्षण महाविद्यालय, जळगाव (तृतीय)
2. वक्तृत्व:- मणियार विधी महाविद्यालय, जळगाव (प्रथम), नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव (द्वितीय), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
४) रंगमंचीय कला प्रकार (नाट्य कला )
1. मुकअभिनय:- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), मु.जे.महाविद्यालय, जळगाव आणि विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (विभागून तृतीय)
2. मिमिक्री:- झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे (प्रथम), मु.जे.महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), पुज्य सानेगुरूजी विद्याप्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शहादा (तृतीय)
3. प्रहसन:- झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे (प्रथम), मु.जे.महाविद्यालय, जळगाव (व्दितीय), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
५) ललित कला
1. व्यंगचित्र:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (व्दितीय), जी.टी.पी. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार (तृतीय)
2. क्ले मॉडेलिंग:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव (द्वितीय), विद्यापीठ प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव (तृतीय)
3. कोलाज:- डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (प्रथम), मु.जे.महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)
4. इन्स्टॉलेशन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव(प्रथम), आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)