मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्षांकडून टप्प्या टप्प्याने उमेदवार जाहीर करण्यात येत आहे. मात्र महायुतीमध्ये काही जागांवरील तिढा अद्यापही सुटलेला नसून हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. महायुतीचा घटकपक्ष आरपीआयला अद्याप एकही जागा मिळाली नाही. रामदास आठवले यांनी महायुतीला दोन जागा देण्याची मागणी केली आहे.
आरपीआयने महायुतीकडे दोन जागांची मागणी केली आहे. या आधी आठवलेंनी आरपीआयला 8 ते 10 मागीतल्या होत्या. मात्र किमान दोन तीन जागा तरी द्याव्यात किंवा विधान परिषद मिळावी. महामंडळ मिळावे. सत्तेत सहभाग ठिक ठिकाणी देण्याचा निर्णय करावा, अशी आमची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकास सुरू आहे, म्हणून आम्ही महायुती सोबत आहोत. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यायमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महायुतीने विचार करावा आणि दोन जागा द्याव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. एका कार्यक्रमासाठी आठवले कल्याणात आले होते. यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.