जळगाव । जळगाव-भुसावळ दरम्यानच्या नशिराबाद जवळील महामार्गावर आयशरने दिलेल्या धडकेने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. तर या दाम्पत्याचा ३ वर्षीय मुलगा रुद्र हा या अपघातात बचावला आहे. मुलगा रुद्र आईच्या कुशीत असल्याने वाचला. मात्र रक्ताच्या थारोळ्यातील आईचा मृतदेह, गंभीर जखमी अवस्थेतील वडिलांना पाहून तीनवर्षीय चिमुरड्याने घटनास्थळी एकच आक्रोश केला. या घटनेत शेनपड्डू बाबुराव कोळी (वय ३५) यांच्यासह त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे.
जामनेर तालुक्यातील सामराेद येथील दीपक काेळी हे पत्नी शीतल व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह आसाेदा येथे बहिणीला मुलगा झाला म्हणून शुक्रवारी आले हाेते. शनिवारी सकाळी परत येत असताना तरसाेद फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला (एमएच १९ एए २०९५) ट्रकने (एचआर ७४ बी ४२४२) समाेरून धडक दिली. त्यात दुचाकीस्वार फेकले गेले. शीतल यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपकने रुग्णालयात जीव साेडला.
दुचाकी आणि ट्रकच्या धडकेची जाणीव हाेताच शीतल यांनी त्यांचा मुलगा रुद्र याला आल्या छातीशी लपेटून घेतले. रस्त्यावर फेकले जात असताना त्याला काही दुखापत हाेणार नाही असे त्याला पकडले हाेते. शीतल यांचे डाेके दगडावर आदळले तरी रुद्रला साधी दुखापत किंवा खरचटले नाही. अपघातानंतर त्याच्या आई-वडिलांना जीएमसी रुग्णालयात आणले असता आईचे शवविच्छेदन सुरू हाेते. तर वडिलांच्या मृत्यूची माहिती रुग्णालयाकडून कुटुंबीयांना देण्यात आली. त्यावेळी हा निष्पाप बालक मामा (आत्याचे पती) शंकर यांच्या मांडीवर डाेके ठेवून झाेपला हाेता. नशिराबाद पाेलिस ठाण्यात आयशर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Discussion about this post