विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे.
ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, उन्मेष पाटील यांना चाळीसागावातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्याच चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणची लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नितीन देशमुख हे शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुरतला गेले होते. पण ते रातोरात पुन्हा ठाकरे गटात आले होते.
कळमनुरी मतदारसंघात शिंदे गटाचे संतोष बांगर यांच्या विरोधात डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणीत राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कन्नड मतदारसंघात उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आळी आहे. सिल्लोड मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सुरेश बनकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छ. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नांदगावात शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मालेगांव बाह्यमधून अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक मध्यमधून वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
पाहा उमेदवारांची संपूर्ण यादी :