मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली.
या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील यांचेसह चोपड्यातून चंदू अण्णा यांना तर एरंडोल पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि. २२ पासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा पारंपारिक मतदारसंघ कोपरी पाचपाखडी येथून निवडणूक लढणार आहे.(केपीएन)तर खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री येथून मंजुळा गावित, चोपडा येथून विद्यमान आ. लता सोनवणे यांच्याऐवजी त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांना तर एरंडोल येथून विद्यमान आ. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जय महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातून चंद्रकांत पाटील तर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. (केपीएन)महायुतीमधील भारतीय जनता पक्षपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची नावे जाहीर झाल्यानंतर आता महायुती प्रचाराला वेग धरेल यात शंका नाही.