जळगाव । दिवाळीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते पण, यावेळी सोने खरेदी सर्वसामान्यांना महाग पडणार आहे. कारण दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीने मोडले सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
शुक्रवारी सोनं 550 रुपयांनी महागलं होतं. यामुळे आज एक तोळं सोन्याची किंमत 79,900 म्हणजेच जवळपास 80 हजारांवर पोहोचले आहे. सोन्याने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. दुसरीकडे चांदीच्या किंमतीत जवळपास 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदी 94,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी सोने दिवाळीत 80 हजारांचा टप्पा गाठेल असा अंदाज होता. तर आता हा आकडा 85,000 रुपयांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेनुसार किंमतीत चढउतार दिसतात. त्यात जीएसटी रक्कम गृहीत धरल्यास यया सणासुदीला ग्राहकांचा मोठा खिसा कापल्या जाणार असल्याचे स्पष्ट होते.