तुम्ही अनेकवेळा कोर्टात न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या डोळ्यावर पट्टी आणि हातात तलवार पाहिली असेल. मात्र आता न्यायदेवतेचे हे चित्र इतिहासजमा झाले आहे. मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकण्यात आली असून हातात तलवारीऐवजी आता संविधान आहे. ‘लेडी ऑफ जस्टिस’च्या नव्या पुतळ्याला सरन्यायाधीशांनी हिरवी झेंडी दिली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पारदर्शक न्यायाचे प्रतीक असलेल्या पुतळ्याच्या डोळ्यावरची पारंपरिक पट्टी काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या हातात तलवारीच्या जागी संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. जे बळावर कायद्याच्या राज्याच्या प्राधान्यावर जोर देते.
या बदलांचा अर्थ काय?
डोळ्यावरची पट्टी काढणे : लेडी ऑफ जस्टिसच्या पुतळ्यावरील पारंपरिक काळी पट्टी काढण्यात आली आहे. हा बदल न्यायाच्या पारदर्शकतेचे प्रतीक आहे, जे दाखवते की न्याय आता अधिक खुला आणि स्पष्ट आहे.
तलवारीच्या जागी संविधान : ‘लेडी ऑफ जस्टिस’ पुतळ्यातील न्यायदेवतेच्या हातात तलवार बदलून संविधानाची प्रत लावण्यात आली आहे. बळापेक्षा कायद्याची प्राथमिकता महत्त्वाची आहे, हे या बदलावरून दिसून येते.
काय आहे महत्त्व: या बदलांचा उद्देश न्याय व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य वाढवणे हा आहे. न्याय हा केवळ सत्तेचा आधार नसून योग्य व न्यायप्रक्रियेचा आहे, असा संदेश यातून मिळतो. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा आधुनिक करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.















Discussion about this post