जळगाव । केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत 50 बसेस तसेच महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरूण येथील ग. क्र. ४१८, ४१९ येथील महानगरपालिका मालकीच्या जागेत बस डेपो बांधकाम ज्यात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा.स्मिता वाघ, आ. सुरेश ( राजू मामा ) भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शहराला मिळणार 50 बस
देशातील १६९ महत्वांच्या शहरामध्ये व राज्यामधील २३ शहरांमध्ये जळगाव शहराचा प्रधानमंत्री ई- बस सेवा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने १२ मी. लांब स्टॅण्डर्ड बसेस २४ नग, ९ मी. लांब मिडी बसेस ६ नग, ६ मी. लांब मिनी बसेस २० नग अशा एकूण 50 बस मिळणार आहेत.
स्थापत्य निगडीत या कामांचा समावेश
प्रस्तावीत कामात वाहनतळ क्षेत्र,पुरक वास्तु, कुंपण भित, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधीत अनुषांगिक कामे असणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 9 कोटी 97 लाख एवढी असणार आहे.
विद्युत विषयक प्रस्तावित कामे
३३ के. व्ही. विद्युत वाहिनी उभारणी (महावितरण) करणे यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ₹७.७५ कोटी असणार आहे. एल. टी. लाईन रोहित्र व इतर अनुषांगिक कामे (महानगरपालिका)अंदाजपत्रकीय रक्कम १.९३ कोटी रुपये आहे.
रामदास कॉलनी येथील ओपन स्पेस विकसीत करण्याच्या कामाचेही पालकमंत्री यांनी केले भूमिपूजन
केंद्र शासन पुरस्कृत भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून ११,१३६ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळात विकासीत करण्यात येणाऱ्या
प्रस्तावित कामात प्रामुख्याने बगीचा विकसीत करणे, जॉगिंग ट्रेक, सुशोभिकरण, मल्टीपर्पज कोर्ट, पिकनिक
एरिया, केअर टेकर्स क्वॉर्टर, टॉयलेट युनिट, वॉटर टँक यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम ४.०५ कोटी रुपये असून यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. हे कामपूर्ण करण्यासाठी 12 महिन्याची मुदत आहे.