मुंबई । महाराष्ट्रमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान बैठकीमध्ये जाहीरनामा, जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजतेय.
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठा आपला जाहीरनामा तयार केला असून त्यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यात येणार असल्याचे दिसतेय., काँग्रेसने महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना काँग्रेसने आखली आहे.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय असणार ?
कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनाः
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटीची असणार
महालक्ष्मी योजनाः
महिलांना प्रति महिना २००० रूपये दिले जाणार आहेत. यासाठी ६० हजार कोटीचा निधी अपेक्षित आहेत.
स्री सन्मान योजनाः
या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. या योजनेसाठी १ हजार ४६० कोटीचा निधी अपेक्षित आहे.
कुटुंब रक्षणः
सर्वांना २५ लाख रूपयांचं विमा कवच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ६ हजार ५५६ कोटीचा निधी अपेक्षित
युवकांना शब्दः
बेरोजगारांना महिन्याला ४ हजार रूपये दिले जातील. साधारण ६.५ लाख युवकांना हा भत्ता दिला जाणार
समतेची हमीः
दलित, अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत साधारण ८.५ कोटी लोकांना फायदा होईल, असा दावा आहे.