सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
एकूण ५६ रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह पदवीधर किंवा फार्मसीमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्री विषयातून पदवीधर असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. fdamfg.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नोकरीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांना दर महिन्याला ३५,४०० ते १,२२,८०० रुपये वेतन मिळणार आहे.