जळगाव : जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाला आता प्रादेशिक परीवहन कार्यालयाचा दर्जा दिला आहे. त्याबाबत अध्यादेश शासनाने आज शुक्रवारी जारी केले. यामुळे आता वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने शुक्रवारी काढलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील 9 उपप्रादेशिक परीवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा येथील उप प्रादेशिक परीवहन कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.
जळगावात सध्या उपप्रादेशिक परीवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परीरवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा देण्यात आला आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाऐवजी आता आरटीओ अर्थात प्रादेशिक परीवहन कार्यालय मंजूर केले होते. त्यानंतर मनुष्यबळ अर्थात कर्मचारी, अधिकारी नियुक्ती संदर्भात अभिप्राय शासनाने मागवले होते. त्यानुसार आता संबंधित प्रादेशिक परीवहन अधिकारी यांना उपरोक्त नमूद प्रादेशिक परीवहन कार्यालयांचे कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा मोठा व क्षेत्रफळही मोठे असल्याने चाळीसगावला उपप्रादेशिक परीरवहन कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव होता मात्र, तो भडगावचा करण्यात होता.
Discussion about this post