Wednesday, August 6, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी

ट्राय सायकल वाटप वितरण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
October 9, 2024
in जळगाव जिल्हा
0
प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी
बातमी शेअर करा..!

जळगाव | सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असून स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी उभी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते दिआज जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित ट्राय सायकल वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

या वेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, अनिल भदाणे , आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छता मोहिमेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन चाकी सायकलिंगचे वितरण करण्यात येत आहे. या ई बाइक सायकलींच्या वापरामुळे गावातील स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविता येणार आहे. या सायकलींमुळे कमी खर्चात व सोप्या देखभालीत उत्तम प्रकारे गावातील स्वच्छता करता येणार आहे. वाटप करण्यात येत असलेल्या सायकलीमध्ये ओला आणि सुका कचरा साठविण्यासाठी दोन कप्पे करण्यात आलेले असल्याने कचरा संकलनासोबतच कचऱ्याचे विलिनीकरण करणे देखील सोपे होणार आहे . जिल्हा परिषदेंतर्गत अलीकडेच मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांची भरती करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील ग्रामसेवकांची कमतरता देखील दूर झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सरपंच , ग्रामसेवक व सदस्यांनी ग्रामस्थांच्या सोबतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता असून या कामासाठी सर्वानी योगदान देण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागात बरेचवेळा कचऱ्याच्या संकलनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असते.त्यामुळे ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रामपंचायतीना उत्पन्न मिळू शकते.त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीना अशा प्रकारच्या घंटा गाड्या उपलब्ध करून देणे महत्वाचे ठरणार आहे.असेही खासदार वाघ या वेळी म्हणाल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री.अंकित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून अनेक वस्तूंची निर्मिती होऊ शकते. या बाबींकडे ग्रामपंचायतीनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कचऱ्याचे संकलन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .त्या दृष्टीने ग्रामपंचायतीनी पाऊले उचलून कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे आवाहन श्री.अंकित यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी केले. तर आभार कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा..!
Previous Post

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पत्रके, भित्तिपत्रके छापणाऱ्या मुद्रणावर सनियंत्रण

Next Post

भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला; रतन टाटा यांचं निधन

Next Post
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला; रतन टाटा यांचं निधन

भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला; रतन टाटा यांचं निधन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

August 5, 2025
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा; कधी होणार निवडणुका?

August 5, 2025
उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

August 5, 2025
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; अर्ज प्रक्रिया सुरू

August 5, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page