रायगड | लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणारी एसटी बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना रायगडमधील माणगावमध्ये घडली. या अपघातामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.
रायगड येथे आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसटी बसमधून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Discussion about this post