हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनेक प्रयत्न करूनही त्यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यात अपयश आले. मात्र कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला.
हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत या विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभेची जागा सुरुवातीपासूनच राज्यातील सर्वात चर्चेत जागांपैकी एक होती. या जागेवर काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट यांना तिकीट देऊन भाजपला शह देण्यासाठी मोठी खेळी केली होती. त्याचवेळी दलित चेहरा असलेल्या कॅप्टन योगेश बैरागी यांना भाजपने तिकीट दिले होते. या रोमहर्षक लढतीत अखेर आता विनिश फोगाटने बाजी मारली आहे.
जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगट विजयी झाल्या आहेत.मतमोजणीच्या १५ फेऱ्यांनंतर त्यांनी भाजपच्या योगेश कुमार यांचा ५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
Discussion about this post