जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकूण ९० जागांसाठी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप या ३ पक्षामध्ये जोरदार टक्कर झाली.या तिन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारते याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल हाती आले आहे. त्यानुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने आघाडी घेतली आहे. परंतु भाजपला चुरशीची लढत दिली जात आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ४६ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी ३ जागांवर तर इतर १४ जागांवर आघाडीवर आहेत.
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटेकी टक्कर सुरू असून भाजपने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखले आहे. पहिल्या अर्ध्या तासांत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स २८ जागांवर आघाडीवर होते आता काँग्रेसची आघाडीवरील जागांमध्ये वाढ होत आहे. तर भाजपचा देखील हळूहळू आकडा वाढत आहे.
Discussion about this post