जळगाव । आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. योगायोगाने सर्व दाढीवाले वरती बसले आहे. नरेंद्र मोदी दाढीवाले, एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला. एखादा निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे”, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले
तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जात आहे. आता या लाडकी बहिण योजनेवरुन शिवसेना शिंदे त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं.जर पुन्हा आमचं सरकार आलं, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरुन तीन हजार करु, अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे”, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
लाडक्या बहिणी हे पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचा सरकार निवडून देणार, असा विश्वासही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. “कोणी कितीही लालसा देऊ द्या, एकवेळ पुरुष बेईमान होतील. पण माझ्या बहिणी कधीच बेईमान होणार नाहीत”, असे विधान त्यांनी केलं.
आमचे मुख्यमंत्री महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत.. आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायचं काम नाही असं काम मुख्यमंत्र्यांनी केला आहे. निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. एसटीमध्ये महिलांना अर्धा तिकीट केल्यामुळे आता एसटी पटापट भरायला लागलेली आहे आणि हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोणताही दवाखान्यामध्ये जा. उपचारासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने एवढे सुंदर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एस. टी मध्ये अर्धं तिकीट, तीन सिलेंडर आणि लाडकी बहीण अशा महिलांसाठी खूप योजना या सरकारने सुरू केली आहे. वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम कोणी केला असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी केला आहे, असे ते म्हणाले.
Discussion about this post