तुम्हीही महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात ५६ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजेच सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्याचसोबत अॅनालिटिकल केमिस्ट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.
पात्रता काय असावी?
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री आणि बायो केमिस्ट्री विषयात पदवीधर किंवा त्यासंबंधित शिक्षण घेतलेले असावे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह पदवीधर किंवा फार्मसीमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागातील या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.fdamfg.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.
Discussion about this post