पुणे । पिंपरी चिंचवडमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. बावधनच्या के. के कन्स्ट्रक्शन टेकडीवर ही घटना घडली. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होते. पुण्याहून मुंबईला हे हेलिकॉप्टर येत होते. उड्डाणानंतर अवघ्या ३ मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळलं. ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचे हे हेलिकॉप्टर होते. HEMRL संस्थेच्या परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.
Discussion about this post