बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया भारतीय निर्यात-आर्यात बँक म्हणजे EXIM Bank मध्ये सुरु आहे.
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.EXIM बँकेतील ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. यासाठी तुम्हाला एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावे लागेल.
एक्झिम बँकेतील ऑफिसर पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी एकूण ८८ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
कोण अर्ज करू शकतो?
बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा एमबीए पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. २७ ते ६५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १ ते २० वर्षांचा अनुभव असावा.कामाच्या अनुभवानुसार उमेदवारांची योग्य पदासाठी निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी समिती तयार केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा
सर्वप्रथम तु्म्हाला एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे eximbankindia.in वर जावे.
त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
यानंतर उमेदवारांनी आपला फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी या फॉर्मची प्रिंट आउट काढावी.
Discussion about this post