मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे, आमदार नितेश राणे सातत्याने भडकाऊ भाषणे करणाऱ्यांची पाठराखण करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक आणि अन्य यांना देखील याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, मुस्लिमविरोधी भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकावी. मुस्लिमांना टार्गेट करणारे मोर्चे, आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. मुस्लिमविरोधी भाषणे, मेसेज पसरवले जाणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जावीत, अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post