पुणे । गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद काढणीसाठी तयार झाले असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक ठेवावे असे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्रात 21 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भाकडून सुरू होईल मग पुढे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.
21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे मात्र पावसाचा जोर 23 ते 24 सप्टेंबर पासून वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात खूपच जोरदार पाऊस होणार असून अगदीच ओढे नाले भरून वाहणार आहेत. एवढेच नाही तर शेतात पाणी घुसण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद यांसारखी पिके काढणीच्या अवस्थेत असतील त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या पिकांची काढणी करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.















Discussion about this post