जळगाव । तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसात सोन्याचे दर २००० रुपये तर चांदीचे तर तब्बल ७००० रुपयांनी वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे, या किंमती आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
सोने, चांदी बाजार गेल्या दोन दिवसांपासून तेजीत आहे. सोन्याने शनिवारी (ता. १४) प्रतिदहा ग्रॅमला ७६ हजार ३२३ (जीएसटीसह) टप्पा गाठला, तर चांदीही प्रती तिकिलो ९१ हजार २५८ पर्यंत (जीएसटीसह) पोचली आहे
गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात मोठी कपात झाली होती. मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळे दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास ७ हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Discussion about this post