जळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असताना त्यांच्या पत्नी शासकीय आशादीप महिला वस्तीगृहाच्या अधीक्षका मयूरी देवेंद्र राऊत करपे (वय ३२) राहणार श्रीराम नगर दादावाडी परिसर यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने पती देवेंद्र राऊत यांना मानसिक धक्का बसून त्यांनी एका इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मयुरी राऊत आणि देवेंद्र राऊत हे दाम्पत्य दोन मुलींसह दादावाडी परिसरातील श्रीरामनगर राहतात या घटनेमुळे परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
देवेंद्र राऊत यांना दुचाकीवर घेऊन मयुरी करपे या स्वतः दुचाकी चालवत खाजगी रुग्णाला घेऊन गेल्या. तेथे त्या मोबाईलवर बोलत असताना अचानक खाली कोसळल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी अचानक सोडून गेल्याने राऊत यांना मोठा धक्का बसला. मी राहून काय करू, स्वतःलाही संपवून टाकतो असे म्हणत ते समोरील एका इमारतीवर चढले आणि स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी धाव घेत त्यांना सावरले. मयुरी यांना मृत घोषित करून त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देण्यात आला.
देवेंद्र राऊत यांना मोठा मानसिक धक्का बसला असून यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती पाहता त्यांना ७२ तास वैद्यकीय निगराणीखाली ठेवावी लागणार असल्याचे डॉक्टरने सांगितलं.
राऊत दाम्पत्यास गौरी व गाथा या दोन मुली असून घटना घडली त्यावेळी त्या शाळेत गेलेल्या होत्या. मयुरी यांच्या अचानक निधनाने या चिमुकल्या मुलींचे मातृछत्र हरविले आहे. दरम्यान, मयुरी यांचा मृतदेह फुलेवाडी संगमनेर या त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.
Discussion about this post