जळगाव । भंडाऱ्याच्या जेवणानंतर सत्तर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली असून बाधित विद्यार्थ्यांवर पारोळाच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली.
विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचार नंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
Discussion about this post