जळगाव । राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाण साधला आहे. या संजय राऊतांना म्हणावं किमान या महापालिका निवडणुकीत उभे राहून नगरसेवक होऊन दाखवा, तेवढीही त्यांची लायकी नाही. आमच्यावर टीका करणारे संजय राऊत कोणी लोकनेता नाही तर आमच्यासारख्या लोकनेत्यांच्या तुकड्यावर मोठा झालेला माणूस आहे. असं म्हटलं आहे.
गद्दारीच्या मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गद्दार आणि खोके याशिवाय यांच्याकडे दुसरा मुद्दाच नसून जर गद्दारी करायची असती तर नारायण राणे आणि राज ठाकरे गेले तेव्हाच फुटलो असतो, तेव्हा आमदार होते आणि ऑफर देखील होत्या, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कुठेतरी लयाला चाललेली दिसली आणि सांगून सुद्धा एखादा टिनपाट माणूस उद्धवजींना सल्ला देत होता आणि त्यांचे ऐकले जात होते, असे म्हणत त्यांनी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
एकदा दोनदा नाही तर चार वेळेला, पहिल्यावेळी कोणताही पिक्चर चालून जाता राऊताचा कोणता पिक्चर आला आहे, सध्या ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकत नाही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागले.
Discussion about this post