राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी तडकाफडकी आमदारकीचा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान, आमदार जितेश अंतापूरकर आता भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकांपासून जितेश अंतापुरकर हे पक्षाच्या रडारवर होते, अशातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये आमदार जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश होता. महाराष्ट्र काँग्रेसकडून याबाबत दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आता काँग्रेसने याबाबत कारवाई करत या दोन्ही आमदारांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय
आज ते भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. आज सायंकाळी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Discussion about this post