धुळे : धुळ्यात बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. गोडाऊनवरही छापेमारी करत कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाई बनावट खत तयार करण्याच्या रॅकेटमध्ये मोठे मासे देखील गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निजामपूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर या कारवाईमध्ये पोलिसांनी एका वाहनासह चालकाला देखील ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या ठिकाणी या बनावट खतांचा साठा साठवून ठेवण्यात आलेला होता. त्या बनावट खतांच्या गोडाऊन वर देखील छापेमारी करून पोलिसांनी बनावट खतांचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे.
पोलिसांनी धाड टाकत केलेल्या कारवाईत जवळपास पोलिसांनी २४ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देगामाल हस्तगत केला आहे. यात एका जनाला ताब्यात घेतले आहे.















Discussion about this post