जळगाव । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून पुन्हा भाजपात जाण्याची घोषणा केली. मात्र त्यांचा अद्याप भाजप प्रवेश झाला नाहीय. त्यामुळे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जळगावमध्ये आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या क्रार्यक्रमाचं निमंत्रण एकनाथ खडसे यांना देण्यात आलेले नाही.त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाचं काय होणार, याची कार्यकर्त्यांना चिंता लागली आहे.
मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर एकनाथ खडसे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते राष्ट्रवादीत गेले. पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी उघड केले होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जून महिन्याच्या अखेरीस दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हापासून नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते होते.
नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय कार्यक्रम आहे. त्याचं कुठल्याही निमंत्रण आमदार म्हणून मला दिलेले नाही.त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार नाही. शासकीय निमंत्रण नसल्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती. नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितले. सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधन कारक असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी माहिती
वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र आता यावेळी जर निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांना निमंत्रण देण्यात न आल्यामुळे प्रशासनाचा उदासीन कारभार समोर आला आहे. आमदार असताना सुद्धा एकनाथ खडसे यांना निमंत्रण का देण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.















Discussion about this post