बुलढाणा जिल्हा परिषद मार्फत भरती निघाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा येथील वैद्यकीय अधिकारी गट ब मधील रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीत ३४ रिक्त पदे भरली जातील. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करणे अपेक्षित आहे.२७ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही भरती आयुर्वेदिक दवाखान्यातील पदार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आहे. या भरतीत वय वर्ष १८ ते ५८ वर्षे या वयोगटातील उमेदवार सहभाग घेऊ शकतात.अर्जासोबतच ३००/- इतके अर्ज शुल्क जमा करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा
अर्ज सादर करतेवेळी तो कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने किंवा पोस्टाच्या माध्यमातून सादर केल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवाराने त्याचा अर्ज आणि त्यासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे तसेच अर्ज शुल्क हे नेमून दिलेल्या पत्त्यावर स्वतः प्रत्यक्ष जाऊन सादर करणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया-
या भरतीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या सर्व अर्जांची पडताळणी करण्यात येईल. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता त्यांना असलेला शासकीय/ निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काम करण्याचा त्यांना असलेला अनुभव, उमेदवारांचे पात्रता फेरीतील परीक्षेतील गुण या सर्वांच्या आधारे उमेदवाराला गुण दिले जातील आणि या गुणांच्या आधारावर पात्र उमेदवारांची निवड पुढच्या फेरीसाठी केली जाईल.
बुलढाणा जिल्हा परिषदेत सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुर्वेदिक दवाखान्यात तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना ४०,०००/- इतके वेतन दिले जाईल. या पदावर नेमणूक होण्यासाठी उमेदवार बि.ए.एम.एस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या या भरती विषयी तसेच तेथील इतर विभाग आणि तेथील भरती विषयी आणि इतर उपक्रमांविषयीची अधिक माहिती बुलढाणा जिल्हा परिषदेच्या https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.















Discussion about this post