जळगाव । नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तीचा आकडा वाढला अशी माहिती मिळत आहे. नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
नेपाळमधील अपघातात आता मृताचा आकडा ३० वर पोहचला असल्याची माहिती खडसे यांनी माध्यामांना दिली. तसेच या अपघातात एकनाथ खडसे यांच्या बालपणी मित्राचा मृत्यू झाला. खुद्द खडसेंनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली तसेच बोलत असताना खडसे भावूक सुद्धा झाले.
घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो असे खडसे म्हणाले. नेपाळ येथून जळगाव विमानतळावर मृतदेह आणण्यात आले, तेथून रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आले. वरणगाव येथील मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केले. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आजच रात्री मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची एकनाथ खडसे यांनी माहिती दिली.















Discussion about this post