आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असून मात्र अशातच भाजपला गळती लागत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे, भाजपमधील समरजित घाडगे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली असतानाच आता दुसरीकडे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील देखील आगामी काळात पक्षबदल करण्याच्या तयारीत आहेत.
ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केल्यानंतर या चर्चांनी आणखीच जोर धरला आहे. माध्यमांसोबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या सूचक विधानानंतर इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदललं आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची मोठी ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहे.















Discussion about this post