मुंबई । बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात फटकारलं आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आज सकाळी या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी कोर्ट म्हणाले आम्हाला याबद्दल फक्त माहिती देऊ नका. याची कागदपत्रे किंवा रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट, केस डायरीही आम्हाला दाखवा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
आता याप्रकरणी राज्याचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टासमोर ही कागदपत्रं ठेवलेली आहेत. सध्या कोर्टाकडून ही कागदपत्र तपासली जात आहे. यानंतर कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात फटकारलं आहे.
न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या चौकशीवरही प्रश्न उपस्थित केले आहे. तुम्ही आतापर्यंत कोणकोणता तपास केला, कोणती चौकशी केली, हे सांगा. तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवण्यास दिरंगाई का केली गेली, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला आहे. आम्हाला त्या दोन्हीही मुलींचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आहेत ते दाखवा. तसेच पीडिता मुलीच्या घरी स्टेटमेंट हे रेकॉर्ड करण्यात आले, त्यावेळी वेल्फेअर अधिकारी उपस्थित होते का? असा प्रश्नही कोर्टाने विचारला आहे.
“गुन्ह्यांची कागदपत्र कोर्टात का दाखवले जात नाहीत?”
दोन्ही न्यायमूर्ती यांच्याकडून आत्तापर्यंत कोणती कारवाई आणि चौकशीबद्दल कागदपत्रे तपासली. हा गुन्हा पॉस्को अंतर्गत येतो, मग लवकरात लवकर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही. शाळेने यासंदर्भात कारवाई करायला हवी होती. मग तुमच्याकडून काहीही कारवाई का झाली नाही. या प्रकरणातील काही गोष्टी या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलेल्या नाहीत. बदलापूर पोलिसांकडून या प्रकरणातील या गुन्ह्यांची कागदपत्र कोर्टात का दाखवले जात नाही, असेही कोर्टाने विचारले.















Discussion about this post