Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बदलापुरात चिमुकल्यांवर अत्याचार ; सुप्रिया सुळेंनी ट्विट करत गृहमंत्र्यांकडे ही मोठी विनंती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
देवेंद्र फडवीसांवर निशाणा साधत सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या..
बातमी शेअर करा..!

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी गृहमंत्र्यांकडे एक मोठी विनंती केली आहे.

“राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा”, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग करत एक विनंती केली आहे. “माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड तणाव येत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे माझे पोलीस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे”, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट
“महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.

यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे, त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती”, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती सुरु ; पात्रतेसह पगार जाणून घ्या

Next Post

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page