मुंबई । मुंबईमधील बदलापुरात दोन चिमुरडींवर शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून या घटनेच्या विरोधात बदलापूरकरांनी संपूर्ण रेल्वे स्थानक जाम केलं. पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अखेर आंदोलकांचा आक्रोश पाहता भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून नागरिकांच्या मनधरणीचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
गिरीश महाजन आंदोलकांशी बोलू लागले यावेळी आंदोलकांनी ‘फाशी…फाशी…’ अशा घोषणाबाजी सुरु केली. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना असा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न केला. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. आरोपीवर कायदेशीर मार्गाने कारवाई होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं.
“घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.
Discussion about this post