नवी दिल्ली । कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला खडेबोल सुनावले.
सुनावणी सुरू झाल्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण या प्रकरणावर एक राष्ट्रीय स्तरावर सार्वमत बनवण्याची आवश्यकता आहे. जर महिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नसेल तर घटनात्मक समानतेला अर्थ काय आहे ? तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याचा विषय आहे. FIR इतक्या उशिरा का दाखल करण्यात आला?” असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.
प्रश्नांची सरबत्ती!
तसेच “अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली? पिडीतेच्या आई वडिलांना उशिरा मृतदेह देण्यात का आला? आणि त्याच रात्री हॉस्पिटलवर मॉबने हल्ला कसा केला? पोलिस काय करत होते? क्राईम सीन सुरक्षित ठेवणे हे पोलिसांचे काम नाहीये का?” अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरले.
Discussion about this post