जळगाव । सोने खरेदीची योजना आखात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चकाकी कायम असल्याचे दिसून आले.
जळगावच्या सराफा बाजारात आज ४०३ रुपयांनी स्वस्त झाले. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०३९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा दर ७०,७९३ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव बुधवारच्या ८०९२१ रुपये प्रति किलोच्या बंद दराच्या तुलनेत आज ८०५९८ रुपये प्रति किलोवर खुला झाला.
२३ कॅरेट सोन्याच्या आयबीजेएच्या दराबद्दल बोलायचं झाले तर आज ते ४०२ रुपयांनी स्वस्त होऊन ७०१०८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३६९ रुपयांची घसरण झाली आणि आज तो ६४४७७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने उघडला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी कमी होऊन ४२७९३ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव २३६ रुपयांनी कमी होऊन ४११७८ रुपये झाला आहे.















Discussion about this post