मुंबई । महाराष्ट्रासह देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारीख आज निवडणूक आयोग जाहीर करू शकतात. यातच राज्यातील महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार? असे विचारले जात आहे. अशातच यावरून आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले,’यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही.
महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला. या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.’ असं म्हणत ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत सांगितलं.
Discussion about this post