मुंबई । भाजपचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली होती. या प्रकरणी नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स पाठवले आहे. कोर्टाने नारायण राणे यांना १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती. त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता.
केवळ आरोप न करता विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय रद्द करुन निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी मागणी विनायक राऊत यांनी केली.
Discussion about this post