जळगाव- कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता आपल्या जगण्याभोगण्याचे अनुभव आपल्या कवितेतून मांडून बहिणाबाई चौधरी यांनी मराठी वाड्मयाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. बोलीभाषेत व्यक्त होतांना शेती, माती आणि सामाजिक अनुभव आपल्या कवितेतून व्यक्त केले. त्यामुळे त्या थोर कवयित्री आहेत असे मत डॉ. योगेश महाले यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. योगेश महाले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे व्यक्तिमत्व व वाड्मयीन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले.
Discussion about this post