तुम्हीही साखर आणि मीठ जास्त खाण्याचे शोकीन असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण तुम्ही रोज विविध पदार्थांच्या माध्यमातून खात असलेल्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. तुम्ही देशातल्या कोणत्याही कंपनीचं किंवा ब्रॅण्डचं मीठ खात असाल तरी ते प्लास्टिकमुक्त नाही. आणि याला साखरही अपवाद नाही..
दिल्लीतल्या टॉक्सिक लिंक या संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या संस्थेनं टेबल, मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठासह 10 प्रकारांच्या मिठाचं संशोधन केलं. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत..त्या पाहूयात..
तुमच्या मीठ-साखरेत प्लास्टिक
मीठ-साखरेवर टॉक्सिक लिंक संस्थेचं संशोधन
मीठ आणि साखरेच्या नमुन्यांत मायक्रोप्लास्टिक
फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात प्लास्टिक
या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलिमीटर ते 5 मिमी.
आयोडिनयुक्त मिठात मायक्रोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण
मिठात 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक
साखरेत 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक
ऑरगॅनिक मिठात प्लास्टिक कमी
या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे यावर संशोधन करण्यात आलं. यासाठी संशोधकांनी मीठ आणि साखरेचे विविध नमुने तपासले. यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे यावर संशोधन करण्यात आलं. यासाठी संशोधकांनी मीठ आणि साखरेचे विविध नमुने तपासले. यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
Discussion about this post