मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्रात भाजपला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. यातच येत्या दोन तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यामुळे भाजपकडून कोणाला संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशातच विधासभा निवणुकीत भाजपकडून भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कोकण, मुंबईनंतर आज भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल, किती गमावणार याची चाचपणी सुरू आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली नाही, तर तिकिट कापले जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मुंबईतल्या बैठकीतही काही आमदारांना कामगिरी सुधारण्याची सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे.
Discussion about this post