मुंबई । काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या भेटीवर वक्तव्य केलय. आता शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या भेटीबद्दल बोलल्या आहेत.
त्या म्हणाल्या की, “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मंत्र्यांना भेटत असतो. मंत्र्यांकडे सामाजिक काम घेऊन जातो. मी दिल्लीत असताना दोन ते तीन मंत्र्यांना भेटते. यामागे कुठला अजेंडा नसतो. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांमधून निवडून आलो आहोत”
“उद्धव ठाकरे सुस्कृंत नेते आहेत. अतिशय चांगल्या वातावरणात एक कुटुंब म्हणून उद्धवजींसोबत काम करताना कधीही दडपण आलं नाही. हसत, खेळत चांगल्या वातावरणात आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कौतुक केलं, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना कधीच दडपण आले नाही. आजही शिवसेनेचा छोटा मोठा कार्यकर्ता आमच्यासाठी प्रियच” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Discussion about this post