सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात बंपर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करावा. विशेष दहावी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या पदांसाठी होणार भरती?
रचना सहायक (गट ब) 261
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
शैक्षणिक पात्रता:
रचना सहायक (गट ब) – स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)-: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट: 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
Discussion about this post