नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. कर्मचारी राज्य बीमा निगम यांच्याकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया एकून 15 पदांसाठी सुरू आहे. यामध्ये बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, फिजियोलॉजी, माइक्रोबायोलॉजी अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. फक्त हेच नाही तर यासोबतच उमेदवाराकडे एक वर्षाची इंटर्नशिप केलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.
या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 56,100 रुपये पगार हा मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी esic.gov.in या साईटवर जा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 16 ऑगस्टच्या अगोदर अर्ज हा करावा लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरती प्रक्रियेची निवड पद्धतीबद्दलची माहिती आपल्याला अधिसूचनेमध्येच वाचण्यास मिळेल. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.
Discussion about this post