राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका, असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे हे खळबळजनक वक्तव्य केले.
प्रकाश आंबेडकर बचाव यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहे. आज त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वाशिममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, ‘मराठ्यांना ओबीसीमधून आधीच १० टक्के आरक्षण दिले गेले आहे. मनोज जरांगे यांचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. त्याबद्दलची भूमिका सरकारने जाहीर करावी. मनोज जरांगे पाटीलची मागणी यापूर्वीच मान्य झाली आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. त्यांना आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फार्मूला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही हा फार्मूला सांगणार नाही.’
Discussion about this post