मुंबई । गेल्या वर्षी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर पक्षांमध्ये इन आऊट सुरु असून अशात राज्यव्यापी शिबिराआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे मनिषा कायंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनिषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करु शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार आणि 12 खासदार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानपरिषदेचा एकही आमदार नव्हता. त्यामुळे मनिषा कायंदे यांच्या रुपाने पहिला विधानपरिषद आमदार शिंदे गटाच्या हाती लागू शकतो. अशारितीने शिंदे गटाने विधानसभेनंतर आता आपला मोर्चा विधानपरिषदेकडे वळवल्याचीही चर्चा सुरु आहे.
Discussion about this post