पुणे । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला असून या मेळाव्यातील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील., माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Discussion about this post