जळगाव | योग ही भारतीय प्रणाली निरोगी आयुष्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यक आहे. योग प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक असून यामुळे समाज जोडण्याचे काम होऊन निरोगी समाज घडविण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी योग महत्त्वपूर्ण आहे. सर्व वयोगटातील जळगावकर नागरिकांना योगाच्या माध्यमातून निरामय जीवनासाठी लांडोरखोरी वनोद्यानातील योगा भवन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्यचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते जिल्ह्य वार्षिक योजनेतर्गत सुमारे ३० लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या योग भवनाच्या लोकार्पण प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे होते.
वन्य प्राणी उपचार केंद्राचे काम लवकरच सुरु होणार !
वन्य प्राण्यांच्या उपचाराकरता जळगाव येथे वन्य प्राणी उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार जळगाव येथे ८ कोटी ८३ लक्ष निधीतून वन्य प्राणी उपचार केंद्र उभारणीस शासनाने मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथील लांडोरखोरी वनोद्यानात १ हेक्टर जागेवर मोठ्या स्वरूपात वन्य प्राणी उपचार केंद्राचे बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर आमदार राजूमामा भोळे यांनी झाडे लावण्यची मोहीम हाती घेऊन यशस्वी करण्यचे आवाहन केले. योग भवनाच्या माध्यमातून जळगावकरांना एक चांगली सुविधा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन देखील आमदार भोळे यांनी केले.
लांडोरखोरी वन उद्यानात योग भवन उभारण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मागणी नुसार डीपीडीसी मधून ३० लक्ष निधी मंजूर केला होता. याचे काम पूर्णत्वास आले असून आज याचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, सहायक वनसंरक्षक उमेश बिरासदार , वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांच्यासह लेखिका मीना सैंदाणे , मोक्ष योगा ग्रुपचे रवींद्र इसाई , प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील, रिद्धी सेठ , वर्षा इसाई, राविनाना भावसार , किशोर पटेल, दिपाली गवळी, उज्वला चौधरी, नंदा जावळे, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी योगाभवन व लांडोरखोरी वनोद्यानात उभारल्या जाणार्या वन्य प्राणी उपचार केंद्राची सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन कृषी विभगाचे प्रकल्प विशेष विषेज्ञ संजय पवार यांनी केले तर आभार सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांनी मानले.
Discussion about this post