मुंबई । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. जर माझ्याविरोधात असेच खोटे आरोप होत राहिले तर नाईलाजाने मला हे ऑडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करावे लागतील, असा इशारा राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिला. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे.
“काल देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोललो, माझावर दबाव होता असं वक्तव्य केले. अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. कशा पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला. आमच्या नेत्यांवर आरोप करण्यात सांगितले. याचे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव होता, यात माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत,” असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
तसेच “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की माझ्याकडेही व्हिडिओ क्लीप आहेत. त्यामध्ये मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत काही बोललो. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी ते व्हिडीओ क्लिप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल,” असा दावा अनिल देशमुख यांनी केला असून देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहेत.
दरम्यान, देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली, जे सरकार विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले. ईडीचे वापर केला, पण सत्तेत सोबत गेले त्यांना क्लीनचिट मिळाली. त्यामुळे अनिल देशमुख बोलले हे खरे असतील, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.















Discussion about this post